विरोधक म्हणजे ‘इकडून’ लफड अन् ‘तिकडून’ लफड, ‘फालतू साले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना दुसरीकडे विरोधक मात्र त्यांच्यावर तुटून पडताना दिसून येत आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात देखील विरोधक आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी दौऱ्यावर देखील विरोधकांनी मोठया प्रमाणावर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

त्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्याला ऊत्तर दिले आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले कि, शिवसेनेच्या बाबतीत बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांना माहिती आहे का ? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. बीड जिल्हा दौऱ्यात माजलगाव शहरात पिक विमा मदत रथ लोकार्पण प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावर आधिक बोलताना ते म्हणाले कि, शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले असे विचारणाऱ्यांनी पंधरा वर्षात काय केले. ‘देता की जाता’ या शिवसेनेच्या आंदोलनासाठी पाच लाख शेतकरी आले होते.

शेतकरी कर्जमाफीसाठी देखील शिवसेनेने सरकारवर दबाव टाकल्याने शेतकरी कर्जमाफी देखील झाली. प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यासाठी मराठवाडा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना आर्थिक मदत देखील केली होती.

दरम्यान, शिवसेनेला कोणी बोलू शकत नाहीत…शिवसेनेने शेतकऱ्यांना जितकी मदत केली आहे. तितकी कोणत्याच पक्षाने केलेली नाही. बाकीच्यांनी पंधरा वर्ष केवळ दिखाऊपणा केला, असे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक