Budget 2019 : सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शुक्रवारी ५ जुलै रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कलावधीतील पहिला अर्थसंकल्प सादर केला. याबरोबरच त्यांनी पुढील एका वर्षात काय काय महत्वपूर्ण सरकारकडून पाऊले उचलण्यात येणार आहेत या विषयी माहिती दिली. विरोधी पक्षांनी मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली.

लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हंटले की, अर्थसंकल्पात कोणतीही गोष्ट नवीन नाही. जुन्या आश्वासनांचीच पुन्हा खैरात करण्यात आली आहे. ते नवीन भारताच्या गप्पा मारत आहेत. परंतु हा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असा आहे. अर्थसंकल्पात काहीही नवीन नाही. रोजगारासाठी कोणतीही योजना नाही.

काँग्रेसचे खासदार पीएल पुनिया म्हणाले की, एक आश्वासक अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सर्व जे आश्वासन देण्यात आले २०२२ पर्यंत सर्वांना घरे २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी, महिलांना सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण याला बँकिंग क्षेत्रांतील सपोर्ट कोठून मिळेल. ५ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आयकर माफ केला. पण पेट्रोल डिझेलवरील सेस वाढवून सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा वाढवला आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार