राज्यसभेतील विरोधकांची ‘ताकद’ कमी होऊन NDA ची ‘पावर’ वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेतील विरोधकांचे संख्याबळ कमी होणार असून यावर्षी 68 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे काँग्रेसला काही जागा गमवाव्या लागणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये काँग्रेसची क्षमता नसल्याने काँग्रेसला 19 जागा गमवाव्या लागतील. प्रियंका गांधी-वड्रा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि रणदीप सुरजेवाल या सारख्या दिग्गज नेत्यांना राज्यसभेत आणण्याचा काँग्रेस विचार करत आहेत. काँग्रेसला स्वबळावर जागा मिळवण्याचा विश्वास असल्याने काँग्रेस मित्र पक्षांच्या मदतीने एक किंवा अधिक जागा जिंकू शकतो.

एप्रिलमध्ये 51 जागा होणार रिक्त
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात काँग्रेसची सत्तेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एप्रिल, जून आणि नोव्हेंबरमध्ये 68 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार असून यानंतर विरोधकांची राज्यसभेतील ताकद कमी होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए वरच्या सभागृहामध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करू शकतो. राज्यसभेच्या 51 जागा एप्रिलमध्ये रिक्त होणार आहेत. तर जूनमध्ये 5, जुलैमध्ये 1 आणि नोव्हेंबर मध्ये 11 जागा रिक्त होणार आहेत.

या काँग्रेस नेत्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार
मोतीलाल वोरा, मधुसुदन मिस्त्री, कुमारी शैलजा, द्विग्विजय सिंह, बीके हरिप्रसाद आणि एमव्ही राजीव गौडा या ज्येष्ठ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल आणि जूनमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यापैकी व्होरा, शैलजा आणि दिग्विजय सिंह यांना पुन्हा पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहेत तर काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि पु.ल. पुनिया यांना उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे.

प्रत्येक राज्यातील रिक्त जागा
चालू वर्षामध्ये नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडमधील राज्यसभेची एक जागा आणि उत्तर प्रदेशातील 10 जागा रिक्त होणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ही समावेश आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये सहा जागा रिक्त होत आहेत. तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पाच-पाच जागा रिक्त होणार आहेत. तसेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी चार जागा रिक्त होणार आहेत. राजस्थानमध्ये रिक्त होत असलेल्या तीन जागांवर काँग्रेस पुन्हा आपल्याकडे ठेवू शकते. तसेच मध्य प्रदेशातील तीन मधून दोन, छत्तीसगड मधून दोन आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून प्रत्येकी एक जागेवर काँग्रेसचा विजय होऊ शकतो.

सध्याची आकडेवारी काय आहे ?
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मेघालय आणि आसाममधील जागा सत्ताधारी गमावतील. सत्ताधारी एनडीएकडे राज्यसभेत स्पष्ट बहुमत नाही आणि या सभागृहात महत्त्वाची बिले मंजूर करण्यासाठी सरकारला एआयएडीएमके आणि राजद सारख्या मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागतो. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक 82 आणि काँग्रेसचे 46 सदस्य आहेत. राज्यसभेची एकूण क्षमता 245 आहे.