विरोधकांनी विकासकामात राजकारण करू नये : आढळराव पाटील

शिक्रापूर: पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापुर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.काही दिवसापुर्वी येथील विकास कामे मंजूर असतानाही जाणूनबुजून अडवल्याचा आरोप शिक्रापुरच्या सरपंच उपसरपंच यांनी केला होता. त्यामुळे या उद्घाटनाला महत्त्व प्राप्त झाले होते तर यावेळी आढळराव पाटिल काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यांनी देखील विरोधकांना प्रेमाचा सल्ला देत सांगितले की विकास कामे करत असताना सर्वांनी एकत्रित येऊन विकास कामे केल्यास मोठा विकास होत असतो परंतु विरोधकांनी विरोध दर्शवण्यासाठी विकास कामांमध्ये राजकारण करू नये.

शिक्रापूर येथील विरोधकांनी अडवलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आढळराव पाटील यांनी सांगितले ,शिक्रापुर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे येथील विकास कामे होऊ द्यायची नाही यासाठी काहीतरी कारणे दाखवून विकास कामे अडविण्याचा प्रयत्न होत होता याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः जातीने लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकासकामांचा मार्ग खुला केला असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले तर राजकारणातील काही लोकांना विकास कामे करण्यापेक्षा विकास कामे अडविण्यात आनंद वाटत असल्याचे देखील बोलून दाखवले. तसेच विरोधकांनो तुम्ही देखील विकास कामे करा आणि आम्हाला ही कामे करू द्या. विकासकामांमध्ये कोणीही राजकारण करू नका असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे.

याप्रसंगी बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, जि.प सदस्य रेखा बांदल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिक्रापूरच्या सरपंच हेमलता राऊत, उपसरपंच रोहिणी गिलबिले, रामभाऊ सासवडे, जयश्री भुजबळ, सागर सायकर, भगवान वाबळे, नवनाथ सासवडे, जयश्री दोरगे, भारतीय जनता पार्टीचे उपतालुका प्रमुख राजेंद्र मांढरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, दत्तात्रय गिलबिले सतीश वाबळे आनंद हजारे विजय लोखंडे यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.