‘मॅंचेस्टर’ युनिव्हर्सिटीच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यास विरोध, विद्यार्थी म्हणाले – ‘ते वर्णवादी होते’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे केवळ देशातच नाही तर देशाबाहेर देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अहिंसेचे पुजारी म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र आता ब्रिटनमधील मँचेस्टरमध्ये त्यांचा पुतळा उभारण्याला विरोध होत आहे.

मँचेस्टर कॅथेड्रेलच्या बाहेर त्यांचा पुतळा उभारण्याविरुद्ध एक मोहीम सुरु केली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांनी या गोष्टीला विरोध केला असून गांधीजी हे वर्णवादी होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

गांधींच्या पुतळ्याला विरोध करत या विद्यार्थ्यांनी ‘गांधी मस्ट फॉल’ हे अभियान सुरु केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी एक खुले पत्र लिहिले असून हा पुतळा उभारणीवर पुर्नविचार करावा असे यामध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर सुरु केलेल्या अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी म्हटले आहे कि, गांधीजी हे अँटी ब्लॅक आणि वर्णवादी होते.

त्यामुळे 25 नोव्हेंबर रोजी होणारा हा मूर्तीच्या स्थापनेचा सोहळा रद्द करावा, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे कि, आफ्रिकेमध्ये ब्रिटिश शासनाविरोधाच्या लढाईत गांधीजींचा सहभाग नव्हता. तसेच त्यांनी गांधीजींविषयी विविध अपशब्दांचा देखील वापर केला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या