आसाम NRC : 19 लाख लोक ‘नागरिकत्व’ सिद्ध करण्यास ‘फेल’, आता ‘हे’ पर्याय

गुवाहाटी : वृत्तसंस्था – शनिवारी आसाम एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. 19 लाख, 6 हजार 667 लोकांना या यादीत समाविष्ट करता आले नाही. एनआरसीचे राज्य समन्वयक प्रितीक हजेला यांनी सांगितले की 3 कोटी 11 लाख 21 हजार लोकांना स्थान मिळालेले असून 19,06,657 लोक यादीतून बाहेर आहेत. यादीत समाविष्ट नसलेलया लोकांकडे कोणते पर्याय आहेत ते जाणून घ्या –

जे लोक एनआरसीमध्ये नाव नसल्यामुळे त्रस्त आहेत, ते 120 दिवसांत फॉरेनर्स ट्रिब्यूनलकडे अपील करू शकतात. अंतिम राष्ट्रीय सिव्हिल रजिस्टर (एनआरसी) मधून वगळलेल्यांच्या तक्रार निवारण्यासाठी आसाम सरकार राज्यात 400 विदेशी न्यायाधिकरणांची स्थापना करणार आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह राजनीती) कुमार संजय कृष्णा म्हणाले की, अशा प्रकारच्या 200 न्यायाधिकरणांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यादीमधून काढून टाकलेल्यांसाठी लवकरच आणखी 200 अधिक न्यायाधिकरण तयार केले जातील. याचिका दाखल करण्यासाठी आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी हे न्यायाधिकरण सोयीस्कर ठिकाणी स्थापन केले जातील.

आज एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. सोनोवाल म्हणाले की, ‘ जे भारतीय नागरिक आहे त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल. तसेच राज्यातील काही संवेदनशील भागातील परिस्थिती नियंत्रणात रहावी, यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.’

एनआरसी –
एनआरसी विभाग आसाममध्ये राहणार्‍या नागरिकांची नोंद ठेवतो. आसाममध्ये राहत असलेले भारतीय नागरिक कोण आणि बांग्लादेशी यांची ओळख पटवण्यासाठी ‘एनआरसी’चा कार्यक्रम राबविण्यात आला. १९५१ मध्ये जनगणनेनंतर या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाकडून राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकांची नोंद केली जाते.

आरोग्यविषयक वृत्त –