ओरल सोरायसिस म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आजवर तुम्ही त्वचेच्या सोरायसिस या आजाराबद्दल ऐकलं असेल परंतु ओरल सोरायसिस बद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का ? क्वचितच ऐकलं असावं. ओरल सोरायसिस हा तोंडामध्ये होत असतो. परंतु हा आजार जास्त गंभीर नसतो. कारण अनेकदा हा सारोयसिस आपोआप बराही होतो. अनेक एक्सपर्ट असं सांगतात की, ही समस्या निर्माण होण्याचं कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होणं हे आहे. अनेकदा हे ओरल हेल्थ किंवा ओरल हायजिन म्हणूनही ओळखलं जातं. जर तुमच्या जिभेवर अजिबात काही वेदना न होणारे चट्टे असतील आणि काही दिवसांमध्ये ते ज ते आपोआप ठिक होत असतील तर ही ओरल सोरायसिसची लक्षणं आहेत. आज आपण ओरल सोरायसिस होण्याची कारणं, तसेच याची लक्षणं, यावर केले जाणारे उपचार आणि बचावासाठी काय करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. यापासून बचाव करण्यासाठी काय करावं हे जर तुम्हाला सजमलं तर तुम्ही या आजारापासून सहज स्वत:ला दूर ठेवू शकता.

ओरल सोरायसिसची कारणं काय ?

अद्याप तरी याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ओरल हायजिन आणि व्हिटॅमिन्सची कमतरता ही याची कारणं आहेत. याच दोन स्थितीतील लोकांमध्ये ओरल सोरायसिस दिसून येतो. मुख्यत्वे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळं ओरल सोरायसिसची समस्या उद्भवते. तंबाखूयुक्त पदार्थ आणि धूम्रापन केल्यानंही ओरल सोरायसिस होऊ शकतो.

काय आहेत ओरल सोरायसिसची लक्षणं ?

–  जीभ आणि तोंडात येणारे वेदनादायी लाल चट्टे ओरल सोरायसिसचं प्रमुख लक्षण आहे.

–  या केसमध्ये काही लोकांमध्ये तोंडात जखम किंवा त्वचा निघण्यासारखी लक्षणंही दिसून आली आहेत.

–  मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर जर तोंडात जळजळ होत असेल तर हे ओरल सोरायसिसचं लक्षणं असू शकतं.

–  अनेकदा ही लक्षणं काही लोकांमध्ये जीभ आणि तोंडातही दिसून आली आहेत.

ओरल सोरायसिसवर उपचार

–  हेल्थ एक्सपर्ट सांगता की, ओरल सोरायसिसवर थेट कोणत्याही उपचारांची गरज भासत नाही.

–  जर शरीरात व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली तर त्यासाठी काही औषधं किंवा व्हिटॅमिन्स असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

–  असं झाल्यास ओरल हायजिन ठेवण्यास सांगितलं जातं.

कसा कराल बचाव ?

जर तुम्हाला ओरल सोरायसिसपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही खालील प्रमाणे उपाय करून स्वत:ला या आजारापासून दूर ठेवू शकता.

–  ओरल हेल्थ उत्तम ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. यासाठी दिवसातून 2 वेळा म्हणजेच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा.

–  तंबाखू गुटखा अशा मादक पदार्थांचं सेवन करू नका.

–  धूम्रपान करत असाल तर आजच बंद करा.

–  जर ओरल सोरायसिसची लक्षणं जास्त दिसू लागली तर कोमत पाण्यात मीठ एकत्र करून त्या पाण्यानं गुळण्या करा.

–  जर शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवत असेल तर वेळीच त्यावर डॉक्टारांकडून उपचार घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.