अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये आर्मी कॅम्पवर ‘ऑरेंज’अलर्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची सूचना मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑंरेज अलर्ट लागू करण्यात आला. दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सैन्य तळावर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. मागील महिन्यात जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोरांच्या घुसखोरी संबंधित सूचना मिळाल्यानंतर अलर्ट घोषित करण्यात आला होता.

बुधवारी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगण्यात आले की पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एक समूहाने भारतीय सीमेवरुन घुसखोरी केली आहे. या सूचनेनंतर भारतीय वायूसेनेने पठानकोटसह आपल्या एअरबेसवर अलर्ट घोषित केले.

सैन्य तळांना सुरक्षित ठेवण्यासाठी सैन्य दलाने पावले उचलली आहेत. मागील महिन्यात सेना आणि एअरफोर्सच्या सर्व तळांवर अलर्ट घोषित करण्यात आला होता. काही दिवसांनी धोका टळल्यानंतर अलर्ट मागे घेण्यात आला होता. परंतू आता पुन्हा एकदा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 ऑगस्ट महिन्यात रद्द केले होते. त्यानंतर पाकिस्तानाने अशा छुप्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना घुसखोरीच्या प्रयत्नात आहे. काही दिवसांपूर्व पंजाबजवळ पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्र पोहचवण्याचा प्रकार समोर आला त्यानंतर पठानकोटमध्ये संवेदनशील ठिकाणांवर शोधमोहिम राबवण्यात आली होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी