‘त्या’ BOLD फोटोमुळे मलायका ट्रोल, युजर्सने केल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे चर्चेत आहेत. दोघेही बॉलिवूडमधील हॉट कपल्सपैकी एक आहेत. मलायका अरोरा इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. यामुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच मलायकाने आता तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पुन्हा एकदा तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात तिने ऑरेंज कलरचा स्विम सूट घातल्याचे दिसत आहे.

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोमुळे मलायका चांगलीच ट्रोल झाल्याचे दिसत आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. अशातच एका युजरने कमेंट केली आहे की, “एकदम बरोबर चॉईस आहे अर्जुन कपूर” याशिवाय अर्जुन कपूरनेदेखील या फोटोवर कमेंट केली आहे. अर्जुन कपूरने हार्टवाली इमोजी टाकत आपल्या भावना मांडल्या आहेत. अशातच मलायकाने मालदीव व्हॅकेशनचा आणखी एक बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मलायकाने फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “If u don’t jump, u will never fly’।Happy Sunday #leapoffaith” या फोटो मलायका ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायकाच्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये क्रिस्टल क्लियर बीच दिसत आहे. दरम्यान चर्चेत येण्याची मलायकाची ही काही तशी पहिलीच वेळ नाही. तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.