नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने शक्ती 98 चौकातील आधार केंद्रात संत्रा महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाऑरेंज संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत्रा विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने शक्ती ९८ चौकातील आधार केंद्रात ह्या शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक सचिन सरसमकर,सागर पवार,राहुल मोरे,दत्तात्रेय सोनावणे, शंतनू खिलारे, मिताली सावळेकर, सुलभाताई जगताप, माणिकताई दीक्षीत, छायाताई सोनावणे, संगीताताई शेवडे उपस्थित होते.
orange

यावेळी बोलताना श्री.आकरे म्हणाले ” नागरिकांना योग्य दरात अस्सल फळं मिळावीत या उद्देशाने हे केंद्र सुरु केले असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा तसेच याद्वारे थेट शेतकऱ्यांनाचा माल विकला जात असल्याने त्याचे दर ही योग्य आहेत.”

orange

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कायमस्वरूपी असे केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली व संत्र्याचा दर्जा आणि दर उत्तम असल्याने पहिल्याच दिवशी टेंपो भरुन माल संपला असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मोलाचा असल्याचे सांगितले. येथे छोटी संत्री ५० रुपये किलो तर मोठी संत्री ७० रुपये किलो दराने उपलब्ध करण्यात आली.