Orange Peel Benefits | संत्र्याची साल कचरा समजून फेकू नका, असा बनवा चहा आणि चांगले ठेवा संपूर्ण आरोग्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – संत्रे (Orange) खाल्ल्यानंतर बहुतेक लोक संत्र्याची साल (Orange Peel) फेकतात, पण तुम्हाला माहिती आहे का? की संत्रे जितके फायदेशीर (Orange Peel Benefits) फळ आहे तितकीच त्याची साल देखील आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. होय, तुम्ही संत्री खात असाल तर आतापासून त्याची साल फेकू नका. संत्र्याची साल सुकवल्यानंतर त्याची पावडर चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्यासाठी (Improving Face Beauty) वापरता येते. तसेच, तुम्ही हर्बल चहा बनवून तो पिऊ शकता आणि अनेक आरोग्यदायी फायदे मिळवू शकता. (Orange Peel Benefits)

 

लोदोव्हॅलीन्युजच्या बातमीनुसार, संत्र्याच्या आतील भागापेक्षा त्याच्या सालीमध्ये 10 पट जास्त जीवनसत्त्वे असतात. संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी त्याचे सेवन करा, चेहर्‍याच्या समस्येपासून सुटका मिळण्यासोबतच आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या तुम्ही स्वतःपासून दूर ठेवू शकता. संत्र्याच्या सालीचे फायदे काय आहेत आणि हर्बल टी (Orange Peel Tea Benefits) कसा तयार करावा ते जाणून घेऊया.

 

संत्र्याच्या सालीत पोषक घटक
संत्र्याच्या सालीमध्ये रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन सी, बी6, कॅल्शियम, फायबर, प्रोव्हिटामिन ए, फोलेट, प्लांट कंपाऊंड पॉलीफेनॉल इत्यादी अनेक पोषक घटक असतात. या सर्व घटकांचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो. लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, अल्झायमर इत्यादी सारख्या जुनाट आजारांना प्रतिबंधित करतात. (Orange Peel Benefits)

 

संत्र्याच्या सालीचे आरोग्य फायदे

इम्युनिटी वाढते
संत्र्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते, त्याचप्रमाणे त्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे इम्युनिटी वाढते. (Immunity) संत्र्याच्या सालीपासून बनवलेला चहा तुम्ही रोज पिऊ शकता किंवा भाजीत घालू शकता.

 

त्वचेसाठी फायदेशीर
त्वचा तरुण ठेवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर केला जातो. याच्या मदतीने ब्लॅक हेड्स, डाग, मुरुम, सुरकुत्या, डेड स्किन सेल्स, त्वचेवरील टॅनिंग या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्वचा चमकदार होते.

 

पचन सुधारणे
संर्त्याच्या सालीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते. पोट स्वच्छ राहते, बद्धकोष्ठता दूर होते. आतडे मजबूत होतात. गॅस, अपचन, पोट फुगणे या समस्या टाळता येतात.

 

दात निरोगी ठेवा
तुम्हाला ओरल प्रॉब्लेम असेल, हिरड्यांची, दातांची कोणतीही समस्या त्रास देत असेल, तर संत्र्याचा वापर करू शकता. साल सुकल्यानंतर पावडर बनवून दात स्वच्छ करा, (Teeth) फायदा होईल. शिवाय हाडे मजबूत होतात.

वजन करा कमी
वजन कमी (Weight loss) करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा चहा प्या. यासोबतच किडनी स्टोनची समस्याही दूर होते.

 

निरोगी ठेवा फुफ्फुस
जास्त वयापर्यंत फुफ्फुसे (Lungs) निरोगी ठेवायची असतील तर संत्र्याची साल खा. यामुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात. फुफ्फुसाचा संसर्ग टाळता येतो. छातीत अडकलेला कफ सहज बाहेर काढला जातो.

 

Advt.

असा करा संत्र्याची सालीचा वापर

सालीचा छोटा तुकडा चावून खाऊ शकता.

चव कडू असेल, पण पोटासाठी खूप चांगले आहे.

स्मूदी, सॅलड, भाज्या घालून देखील शिजवता येते.

 

असा बनवा संत्र्याच्या सालीचा चहा
चहाच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी टाकून गॅसवर उकळवा. संत्र्याच्या काही साली सोलून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून त्यात टाका.
पाणी 1 मिनिट उकळले की गॅसवरून उतरवा. एका कपात गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी किंवा गोडवा आणण्यासाठी
तुम्ही यात अर्धा किंवा एक चमचा मध देखील घालू शकता. हा चहा प्या आणि अनेक आरोग्य फायदे मिळवा.

 

 

Web Title :- Orange Peel Benefits | health benefits of orange peel how to make orange peel tea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमध्ये WhatsApp वरुन सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; दिवसा तासाला 5-9 हजार तर रात्री 20 हजार

 

Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत

 

Mutual Fund SIP | दररोज गुंतवा 167 रुपये, निवृत्तीपुर्वी तुम्ही बनाल करोडपती, मिळतील 11.33 कोटी; जाणून घ्या