‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार अ‍ॅप चे नवे वर्जन आणले आहे. या नव्या लॉन्च करण्यात आलेल्या अ‍ॅपचे नाव आहे mAadhaar. ज्याला अ‍ॅण्ड्राइड किंवा आयओएस यूजर्सला सहज डाऊनलोड करता येईल. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही सहज आपले आधार कार्ड रिप्रिंट करु शकतात. यासाठी तुम्हाला 50 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसात आधार कार्डचे रिप्रिंट मिळेल. परंतू तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की प्रिटेंड आधार कार्ड तुमच्या नोंदवलेल्या पत्त्यावर येईल.

नव्या अ‍ॅपवर मिळणार या सुविधा –
नव्या आधार अ‍ॅपवर तुमचे काम अधिक सोपे होणार आहे. या नव्या अ‍ॅपमध्ये ऑफलाइन केवायसी, क्यूआर कोड स्कॅन, रिप्रिंटची ऑर्डर, पत्ता अपडेट करणे, आधार वेरिफाय करणं, ई मेल वेरिफाय करणं, यूआयडी रिट्रीवची रिक्वेस्ट असे अनेक कमी घरबसल्या करता येतीत. तुम्ही या द्वारे ऑनलाइन रिक्वेस्टचा स्टेटस देखील तपासू शकतात.

असे इंस्टॉल करा mAadhaar अ‍ॅप –
1. प्ले स्टोअर मध्ये जा.
2. अ‍ॅप इस्टॉल करा,
3. यानंतर तुम्हाला ही असलेली रिक्वेस्ट पाठवावी लागेल.
4. यानतंर अ‍ॅपमध्ये नवीन पासवर्ड सेट करा.
5. हा पासवर्ड प्रत्येकवेळी अ‍ॅपचा वापर करताना तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
6. हा पासवर्ड 4 अंकी असावा.

13 भाषामध्ये अ‍ॅप –
या अ‍ॅपमध्ये 13 भाषा आहेत. ज्यात इंग्रजी, हिंदी, बांग्ला, ओडिसी, उर्दु, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, गुजराथी , पंजाबी, मराठी आणि असामी या भाषाचा समावेश असेल.

नव्या आधार अ‍ॅपमध्ये दोन प्रमुख सेक्शन आहेत. यात एकाचे नाव आधार सर्विसेज डॅशबोर्ड आणि माय आधार सेक्शन आहे.

1. आधार सर्विस डॅशबोर्डवर सर्व प्रकारचे आधार ऑनलाइन सर्विसेज आहेत. हे आधार धारकांसाठी असेल.

2. My Aadhaar Section –
हे एक प्रकारच्या आधार प्रोफाइलचे पर्सनलाइज्ड स्पेस असेल. यासाठी यूजरसाठी आपल्या आधार प्रोफाइलसाठी रजिस्टर करावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/