Coronavirus : पुणेकरांनो सावधान ! … तर विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती तात्काळ ‘सील’ करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा केली आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची यादी जाहीर करण्यात आली असून ते सर्व क्षेत्र मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 5 आढळल्यास ते विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, विशिष्ट इमारती, गृह निर्माण सोसायटी तात्काळ सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


5 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी तात्काळ परिसर सील करणार आहेत. दरम्यान, नवीन प्रतिबंधित क्षेत्रामधील आवश्यक त्या ठिकाणी येण्याचे आणि जाण्याचे मार्ग हे संबंधित भागातील पोलिस अधिकारी त्या भागातील क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या सहकार्याने अडथळे उभे करणार आहेत. जो भाग प्रतिबंधित क्षेत्र राहिलेला नाही तेथील अडथळे काढण्यात येणार आहेत.