बाबरी मशीदीबाबतच्या त्या वक्तव्यावरून साध्वीच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई :  वृत्तसंस्था – शहिद हेमंत करकरेंबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्यानंतर आता बाबरी मशि‍दीबाबत केलेल्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी मी देखील त्यात सहभागी होते. त्याचा मला अभिमान आहे. असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला ही संधी दिली.

त्याचा मला अभिमान आहे. तेथे मंदिर निश्चितच बांधले जाईल असे आम्ही निश्चित करू असे त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यानंतर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकऱणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. त्यानंतरही त्या आपल्या मतावर ठाम होत्या. राम मंदिर बांधण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. असं त्या म्हणाल्या होत्या.