ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्याने युवकाची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन खरेदी मध्ये बऱ्याच वेळा फसवणूक झाल्याचे समोर आले. असाच एक प्रकार औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यात घडला आहे. मात्र इथे ऑनलाईन खरेदी मध्ये फसवणूक झाल्याने एका तरुणाने चक्क आत्महत्या केली आहे. ऑनलाईन खरेदी मध्ये मोबाईल मागविला मात्र पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी दगड निघाला यामुळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. ( १९ फेब्रुवारी ) मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून, अनिल उत्तम पाडळे (२१, रा. धोत्रा, ता. सिल्लोड) असे या तरुणाचे नाव आहे.

औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातील रहिवाशी असलेला अनिल उत्तम पाडळे (२१, रा. धोत्रा, ता. सिल्लोड) या तरुणाने काही दिवसांपूर्वी १५ हजार रुपयांचा मोबाईल ऑनलाईन खरेदी मध्ये मागविला होता. दरम्यान ऑनलाईन खरेदी मध्ये मागवल्या मोबाईलचे पार्सल घेण्यासाठी अनिल मंगळवारी दुपारी पानवडोद येथील टपाल कार्यालयात गेला होता. पार्सल सोडविल्यानंतर त्यात दगडाचे तुकडे आढळले. त्यावेळी आपले १५ हजार रुपये वाया गेले, त्यामुळे तो नाराज झाला. इतकेच नव्हे तर या बाबद त्याने त्याच्या मित्रांना तसेच नातेवाईकांनाही सांगितले. मात्र त्यासंदर्भात नाराजी असल्यामुळे त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

यासंदर्भात अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचे शवविच्छेदन सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. धोत्रा येथे रात्री उशिरा अनिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशेष म्हणजे, अनिलने ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्यानेच आत्महत्या केली अश्या संदर्भात आमच्याकडे अश्या कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास केल्या नंतर खरे कारण समोर येईल. असे अजिंठा सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी म्हंटले आहे.