सावधान ! ऑनलाईन फूड ऑर्डर करताना सॉफ्टवेअर इंजिनियरची २.२८ लाखाची फसवणूक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजकालच्या धावपळीच्या युगात ऑनलाईन फूड ऑर्डर करणे अनेकांना सोईचे वाटते. ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या देखील मोठ्या प्रमाणावर सूट देत असल्याने ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु गेल्या काही दिवसांतील फसवणुकीच्या घटना पाहता अशा प्रकारे खाणं ऑर्डर करणं तितकंसं सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच हरियाणाच्या रोहतक शहरात ८०००० रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीची घटना घडल्यानंतर मध्यप्रदेशातील इंदोरमध्येही अशाच पद्धतीची घटना समोर आली आहे. येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियरची तब्बल २.२८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

अशी झाली फसवणूक :

मध्यप्रदेशातील इंदोरच्या संजय दुबे या इंजिनियरने आहार नावाच्या एका अ‍ॅप वरून जेवण ऑर्डर केलं होतं. तेव्हा या ऑर्डर साठी त्याचे जास्तीचे २८० आकारले गेल्याचे त्याच्या लक्षात आले. विनाकारण जास्तीचे पैसे अकाउंट मधून गेल्याने त्याने तक्रारीसाठी हेल्पलाईनला कॉल केला आणि आपले पैसे परत करण्याची मागणी त्याने कंपनीकडे केली. तक्रार केल्यानंतर २ दिवसांनी आलेल्या एका कॉल वर समोरील व्यक्तीने आपण अधिकारी असल्याचा दावा करत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर समोरील व्यक्तीने सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचे कारण देत एक रिमोट डिवाइस कंट्रोल अ‍ॅप डाउनलोड करण्याची विनंती केली.

संजय यांनी अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर या तोतया अधिकाऱ्याने त्या अ‍ॅपचे लॉगईन आयडी, पासवर्ड आणि इतर माहिती मागितली. त्यांनी ती दिली मात्र यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी लगेच आपल्या बँक अकाउंट मधील पैसे चेक करण्याचा आणि अकाउंट वरील पैसे पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अकाउंट वरून तब्बल २.२८ लाख रुपये गायब झाले होते. त्यानंतर त्यांनी झालेला प्रकार बॅंकेमध्ये फोन करून कळवला. बँकेला त्यांनी खातं डिसेबल आणि डेबिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितलं. बॅंकेने डेबिट कार्ड ब्लॉक केलं पण नेट बँकिंग आणि खातं तसचं अ‍ॅक्टिव्ह राहू दिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी खात्याची तपासणी केली असता मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

हरियाणा मध्येही घडला होता असाच प्रकार :

हरियाणामधील साक्षी नावाच्या विद्यार्थिनीने झोमॅटोवरून मागवलेलं खाणं चांगलं नसल्याने तिने तक्रार करण्यासाठी झोमॅटोच्या कस्टमर केअर ला कॉल करून रिफंडची मागणी केली असता समोरील व्यक्तीने अधिकारी असल्याची बतावणी करून बँकेच्या संदर्भातील गोपनीय माहिती तिच्याकडून घेतली आणि तिला तब्बल ८० हजार रुपयांचा गंडा घातला गेला.

अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याने ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या अ‍ॅप च्या सुरक्षिततेसंदर्भात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like