Ordnance Factory Launches | पीएम मोदींनी केली 7 नवीन संरक्षण कंपन्याची सुरुवात, फायटर प्लेनपासून पिस्टलपर्यंत होईल तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ordnance Factory Launches | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी 7 नवी संरक्षण कंपन्यांची सुरुवात करताना म्हटले की, हा राष्ट्राला संरक्षण क्षेत्रात सशक्त करण्याचा प्रयत्न आहे. काळाच्या ओघात भारत आपल्या संरक्षण क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशांवर अवलंबून राहत गेला. काळाप्रमाणे कंपन्या अपग्रेड (Ordnance Factory Launches) करण्यात आल्या नाहीत.

15-20 वर्षापासून लटकला
मोदी म्हणाले, 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीजला नवीन स्वरूप देण्याचा निर्णय, 7 नवीन कंपन्यांची ही सुरुवात, देशाच्या याच संकल्प यात्रेचा भाग आहे. हा निर्णय मागील 15-20 वर्षापासून लटकला होता. मला पूर्ण विश्वास आहे की, सर्व सात कंपन्या आगामी काळात भारतीय सैन्यबळाला एक मोठा आधार ठरतील.

दशकांपासून रखडले होते काम पूर्ण करतोय
त्यांनी म्हटले की, यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश एका नवीन भविष्याच्या निर्मितीसाठी नवीन संकल्प घेत आहे आणि जे काम दशकांपासून रखडले होते ते पूर्ण करत आहे.

स्वातंत्र्यानंतर संरक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष
पीएम मोदी यांनी पुढे म्हटले की, महायुद्धाच्या काळात भारताच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीजची क्षमता (Ordnance Factory Launches) जगाने पाहिली. आपल्याकडे चांगली साधने होती, वर्ल्ड क्लास स्किल होते. स्वातंत्र्यानंतर या फक्टरीज अपग्रेड करण्याची आवश्यकता होती, न्यू एज टेक्नोलॉजी घेण्याची आवश्यकता होती, परंतु याकडे जास्त लक्ष दिले गेले नाही.

‘मेक इन इंडिया’सह हा संकल्प
मोदी म्हणाले, आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत देशाचे लक्ष्य भारताला स्वबळावर जगातील मोठी सैन्यशक्ती बनवणे आहे, भारतात आधुनिक संरक्षण क्षेत्राच्या विकासाचे आहे. मागील सात वर्षात देशाने ‘मेक इन इंडिया’च्या मंत्रासह हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे.

अडवणुक धोरण बंद केले
पीएम मोदी यांनी म्हटले की आज देशाच्या डिफेन्स सेक्टरमध्ये जेवढी transparency आहे, trust आहे,
आणि technology driven approach आहे, तेवढी अगोदर नव्हती.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आपल्या डिफेन्स सेक्टरमध्ये इतके मोठे reforms होत आहे,
अडवणुक धोरणाऐवजी सिंगल विंडो सिस्टमची व्यवस्था केली आहे.

या 100 उपकरणांची आयात बंद
त्यांनी म्हटले की, काही काळापूर्वीच संरक्षण मंत्रालयाने अशा 100 पेक्षा जास्त सामरिक उपकरणांची यादी जारी केली होती,
जी आता बाहेरून आयात केली जाणार नाहीत. या नवीन कंपन्यांसाठी सुद्धा देशाने आतापासूनच 65 हजार कोटी रुपयांची ऑर्डर प्लेस केली आहे.

स्टार्टअप्सला केले आवाहन
आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीजमध्ये देशाचा विश्वास दिसतो. मी देशाच्या स्टार्टअप्सला सुद्धा सांगतो की,
या 7 कंपन्यांद्वारे आज देशाने जी नवीन सुरुवात केली आहे, तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हा.
तुमचा रिसर्च, तुमचे products कशाप्रकारे या कंपन्यां सोबत मिळून एकमेकांच्या क्षमतांनी लाभ होऊ शकतो,
याबाबत विचार करा. (Ordnance Factory Launches)

Web Title :- Ordnance Factory Launches | prime minister launch seven new ordinance factor says try to empower in defence sector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट आता राहील सुरक्षित, असे ऑन करू शकता एंड-टू-एंड इनक्रिप्शन फीचर

Mahadev Jankar | ‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’

PM-Kisan | कोट्यवधी लोकांचे नशीब उजळले, आता दरमहिना मिळतील इतके हजार रुपये; ताबडतोब जाणून घ्या प्रक्रिया