मरता-मरता 5 जणांना सेवारामनं दिलं जीवनदान अन् झाला ‘अमर’

धौलपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील गंगा दास गावच्या पुराचा १७ वर्षाचा सेवाराम मरण पावला नाही तर तो अमर झाला आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सेवारामचा देह दान केला आहे. त्यामुळे पाच व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. यामुळे धौलपूरचा सेवाराम अमर झाला.

सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच जणांच्या शरीरात धगधगणार. सेवाराम या जगात राहिला नसला तरी त्याच्या आठवणी राहिल्या आहेत. त्याचे आई-वडील त्या पाच लोकांना आपल्या मुलाच्या रूपात पाहणार आणि आता पाच कुटुंबांमध्ये संबध जोडले जातील. आई वडिलांनी मोठ्या गर्वाने त्यांच्या मुलाचे नाव सेवाराम हे ठेवले आणि शेवटी तो मरता मरता पाच लोकांची सेवा करून गेला.

धौलपूर जिल्ह्याच्या निनोखर ग्रामपंचायचे गाव गंगा दासचे पुरा निवासी १७ वर्षीय सेवारामची १६ फेब्रुवारीला अल्हेपुरा येथे बाईक स्लिप झाली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जखमी झाला. उपचारासाठी कुटुंबीयांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपसारासाठी ग्वालियरला हलवण्यात आले. तरीही त्याच्या तब्बेतीत सुधारणा झाली नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी जयपूरच्या सर्वात मोठ्या एसएमएस रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी मध्यरात्री सेवारामचा ब्रेन डेड झाला.

डॉक्टरांनी नातेवाईकांना देहदान करण्यासाठी सांगितले. कुटुंबियांना यावर सहमती घेऊन देहदान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे पाच लोकांना नवीन जीवन मिळाले आहे. अवयव दान केल्यानंतर सोमवारी एसएमएस हॉस्पिटल जयपूर येथील वैद्यकीय पथकाने त्यांना शहीद दर्जा देऊन पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्याचे शव गावात आणले गेले. गावात शव आल्यानंतर गावकऱ्यांनी पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून परिवाराचे आभार मानले.

सेवारामचे पार्थिव गावात पोहचले तेव्हा तेथे एकीकडे शोक होता तर दुसरीकडे अभिमान वाटत होता, कारण गावच्या मुलाने निरोप घेऊन पाच जणांना जीवन दिले. जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये राज्यातील ४२ वा अवयवदान करण्यात आला. ज्यात १७ वर्षीय सेवारामचे हृदय, यकृत, किडनी, लंग्ज परिवाराच्या संमतीने दान केले गेले.

धौलपूर जिल्हा हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समरवीर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक होताच त्याला केंद्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू कुटुंबीयांनी त्याला एसएनएस जयपूर येथे दाखल केले. शेवटचा श्वास घेत त्याने पाच जणांना जीवनदान दिले. त्याचे मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुस दान करण्यात आले. या उत्कृष्ट कामाबद्धल मी त्याच्या कुटुंबियांचे कौतुक करतो. आम्ही त्याच्या परिवाराला सलाम करतो आणि कायम त्यांना लक्षात ठेऊ, असे सिंह म्हणाले.