महागडे अवयव प्रत्यारोपण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

पोलीसनामा ऑनलाइन – अवयवांची गरज असलेल्या रुग्णांवरील अवयव प्रत्यारोपणाचा खर्च खूपच मोठा असतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडत नसल्याने सरकारने कमी खर्चात अवयव प्रत्यारोपण उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करायचे असल्यास येणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

या प्रत्यारोपणासाठी सुमारे १४ ते १५ लाख रुपये रुग्णाला खर्च करावे लागतात. ज्यांच्याकडे ही मोठी रक्कम नाही, त्यांनी मृत्यूची वाढ बघणे एवढेच शिल्लक राहते. हे मानवतेला धरून नसल्याने सरकारने गरीब, सर्वसामान्य रूग्णांसाठी अल्प दरात ही प्रत्यारोपण उपलब्ध करून द्यायला हवे. सरकारी रुग्णालयातही प्रत्यारोपणाचा खर्च खूपच जास्त आहे. रुग्णांना हा खर्च परवडणारा नसतो. सरकारने याबाबत योग्य निर्णय घेतल्यास प्रत्यारोपणाचा खर्च कमी होऊ शकतो. सध्या यकृताचा विकार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून विशेषतः लहान मुलांमध्ये यकृत निकामी होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत.

बदलती जीवनशैली आणि आनुवंशिकतेमुळे हा त्रास जाणवतो. लहान मुलांच्या यकृताच्या समस्येचं निदान आणि उपचार तातडीने झाले पाहिजे. परंतु, खर्चिक् चाचण्यांसाठी रुग्णांकडे पैसे नसल्याने उपचार करण्यात अडथळे येतात. अशा रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने नवा उपक्रम सुरू करावा अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. पालिका आणि सरकारी रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. पण याठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा सरकारने अद्यापही पुरवलेल्या नाहीत. त्यामुळे सुरूवातीला आरोग्य व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे.

You might also like