बालगोपाळांच्या आठवडी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी. या हेतूने प्रेरित होऊन हणबरवाडी मसूर या ठिकाणी बालगोपाळांचा आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. केंजळे, संगीता मोहिते, सुनीता शेडगे, मंदा शेडगे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या आठवडी बाजाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला. चिमुकले व्यापारी वस्तूंची, फळे भाज्यांची विक्री करताना पाहून अनेक नागरिक आश्चर्य चकित झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळभाज्या, फळे, खाऊ पदार्थ बटाटे वडा, भजी, पाणीपुरी, भेळ, आदी खाद्यपदार्थ, मेकअप साहित्य, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या. सर्वात जास्त गर्दी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर पाहायला मिळाली. हणबरवाडी बहुसंख्य ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या दोन-अडीच तासांच्या बाजारात चांगली विक्री विद्यार्थ्यांनी केली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पालकवर्गाची वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.

चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे व पै. सिद्धनाथ शेडगे यांनी आवर्जून बालबाजाराला भेट दिली. या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक करून बाजारातील अनेक वस्तू व भाज्यांची खरेदी करून विध्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. शेडगे म्हणाले की, शालेय जीवंनातूनच विद्यार्थ्यांना असे व्यवहारिक ज्ञान आत्मसात करता आल्याने शाळेचे त्यांनी विशेष कौतुक केले. ‘प्लॅस्टिक पिशवी टाळा कापडी पिशवी वापरा’ हा संदेश त्यांनी यावेळी दिला. शालेय शिक्षणाबरोबर विध्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान असणे ही आजची गरज आहे, असे रामकुमार शेडगे म्हणाले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. केंजळे, संगीता मोहिते, सुनीता शेडगे, मंदा शेडगे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी हणबरवाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.

फेसबुक पेज लाईक करा –