कोंढवा पोलिसांतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुरुवार दि. २४/०५/२०१९ राेजी सायंकाळी १८:३० ते १९:१५ वा. च्या दरम्यान काेंढवा पाेलीस स्टेशन च्या हद्दीतील तेजस हाॅल येथे रमजाण ईद सणाच्या अनुषंगाने ह्युमिनीटी फाउन्डेशन व काेंढवा पाेलीस स्टेशनच्या वतीने ईद निमित्ताने रोजा सोडण्याकरता इफ्तार पार्टीचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी जातीय सलोखा राखून हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन यांनी एकतेचा संदेश दिला. सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माजी पोलीस उपायुक्त परिमंडळ पुणे शहर प्रकाश गायकवाड, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर मिलिंद पाटील हजर होते.

विविध धर्माच्या मान्यवरांच्या उपस्थितीत
याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे शहर प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग मिलिंद पाटील, कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम समाजातील धर्मगुरू, कोंढवा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम बांधव असे २०० ते २५० नागरिकांचा जनसमुदाय कार्यक्रमास उपस्थित होता.