लोणी काळभोर येथे अष्टांगयोग शिबिराचे आयोजन

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – अष्टांगयोग परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तीन दिवसाय मोफत अष्टांगयोग साधना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत काळभोर लॉन्स मंगल कार्यालयात (दि. 24 ते 26 जानेवारी) दरम्यान सकळी 6 ते 7.30 या वेळेत हे शिबिर पार पडेल.

भीष्माचार्य संत शिवकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात उपस्थित राहणाऱ्यांना प्रत्येक योग प्रशिक्षणार्थीस लक्ष्मीतरु आयुर्वेदिक वनस्पती चे रोप भेट देण्यात येणार आहे. या वेळी या वृक्षाची माहीती देण्यात येणार आहे. या शिबिरात योगासह ध्यान धारणा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजचा युवक शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसीक, आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन तंटामुक्त गाव समतीचे माजी अध्यक्ष भास्कर काळभोर व श्री श्री रविशंकर गुरूजी यांचे शिष्य प्रभाकर जगताप यांनी केले आहे.

या योग शिबीरातून मानसिक ताण तणाव दूर होण्यास मदत होईल. तसेच आपली शरीर संपदा चांगली राहण्यास मदत होणार आहे. म्हणून तरुण, वयस्कर तसेच बाल चमुंनी अवश्य याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –