पुण्यात अखिल भारतीय वडार बोली साहित्य परिषदेचे आयोजन (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय वडार बोली साहित्य परिषदेच्या वतीने ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरीत पहिल्यांदा वडार समाजाचे साहित्य संमेलन दि . 29 डिसेंबर 2019 रोजी येरवडा येथील लोकशाहीर साहित्य शाहीर अण्णाभाऊ साठे कला मंदीर पुणे येथे संपन्न होत आहे. अखिल भारतीय बोली वडार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक शिवमुर्ती भांडेकर हे असून या संमेलनाचे उद्घाटक पुणे महानगरपालिकेचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होईल.

तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक व वडार समाजाचे युवा नेते मा. नितीन अण्णा धोत्रे हे राहणार आहेत. संमेलनात प्रमुख वक्ते, प्रसिद्ध विचारवंत व संशोधक मा. श्रीमंत कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दुसरे वक्ते जेष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण वडार समाजाचे इतिहास व आजची सद्यःस्थिती बाबत भाष्य करणार आहेत. सदर साहित्य संमेलन चार सत्रात संपन्न होत असून पाचव्या सत्रात समारोप होईल. पहिल्या सत्रात उद्घाटन व संमेलन अध्यक्ष व प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होईल.

पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे मा. आमदार अशोक पवार – शिरुर, पुणे, मा. रवी माकले – बेंगलुर, (कर्नाटक), मा. लक्ष्मणराव देगलुरकर – पुणे, प्रमुख उपस्थिती रमेश शिंदे – पुणे, श्री. अनिल मोहीते, सुरेश नलावडे, जालीधर मंगळवेडेकर, कल्पनाताई पवार, बाबुराव निंबाळकर, माजी महापौर – हणमंतराव भोसले, रामदास पवार, माजी उपमहापौर (पुणे), मुकारी अण्णा अलगुडे, माजी उपमहापौर, पुणे, सुरेश धोत्रे – माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे, श्रीमती संगिताताई धोत्रे – माजी नगराध्यक्षा तळेगाव दाभाडे उपस्थित राहणार असून वडार समाजात प्रथमच समाजाचे प्रश्न व साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, तसेच जगावं कसं, राहाव कसं अशा हतबल झालेल्या समाजाचे प्रश्नांची सरकारने नोंद घ्यावी अशी अपेक्षा आहे.

सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी सयोजन समिती गठीत करण्यात आली असून संयोजन समितीचे अध्यक्ष अशोक पवार, कार्याध्यक्ष हरिष बंडीवडार, डॉ. प्रा. अशोक बंडगर, मच्छिंद्र धनवटे, ह. भ. प. श्री. कृष्णा महाराज मोहिते, कवी सचिन चव्हाण, दयानंद इरकल, जगनाथ पवार कराड, सुरेश अलकुटे, संजय देवकर, ललिताताई धनवटे, निर्मलाताई कु – हाडे, माधुरी चव्हाण, विजय चौगुले, नामदेवराव धनवडे, सदाशिव जाधव, लिलाताई लष्करे, शामराव पवार – बुलढाणा, सुरेश इटकर, शाम विटकर, श्रीरंग नलावडे, महेंद्र पवार, शोभाताई माने, जगन्नाथ गुंजाळ इत्यादी सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/