Baramati News : बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन, दोघांवर FIR दाखल

बारामती: पोलीसनामा ऑनलाईन – बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही सोनगाव (ता.बारामती) येथे शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 23) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल सुभाष सपकाळ आणि विजय बाबाजी देवकाते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दत्तात्रय मदने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 23 ) सकाळी साडे अकरा वाजता सोनगावच्या हद्दीत सूळवस्ती येते ढेकळवाडी रस्त्यावर देवकाते यांच्या शेतात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी असताना आरोपींनी लोकांना एकत्र आणून गर्दी केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असतानाही बेकायदेशीरपणे आयोजन करून बैलांना निर्दयतेची वागणूक देत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.