सरस्वती, निर्मला विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व बक्षीस वाटपाचे आयोजन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरस्वती विद्या मंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मला, सरस्वती कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे संजय होळकर (मविप्र. क्रीडा प्रशिक्षक), डॉ.मनीषा रौंदळ (समाजसेविका), अक्षय देशमुख (आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू), रसिका शिंदे (रणजी महिला खेळाडू), यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष अशोक होळकर, सदस्य- गुणवंत होळकर, डॉ. चांदर, बाळासाहेब बोरसे, मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले.

संजय होळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरु हेच मित्र, अनुभवाच्या जोरावर यश, जीवनात पुढे जाण्यासाठी प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द, धाडस असावे, वेळेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी सायकलचा वापर करावा, सायकल चालवणे उत्तम व्यायाम, जीवनरुपी ज्योत पेटवण्यासाठी ज्ञानाची गरज, शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द,चिकाटी, मेहनत असावी, खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होतो. आशा विविध विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कबड्डी मुलांमध्ये क. भा. पा. शाळा विंचूर-प्रथम, कलगिधर इंग्लिश स्कूल- द्वितीय, जि. प. शाळा सुभाष नगर- तृतीय. मुलींमध्ये जि. प. शाळा, सुभाष नगर- प्रथम, सरस्वती विद्यामंदिर- द्वितीय, कलगिधर इंग्लिश स्कूल- तृतीय. लांब उडी मुले रोशन गाडे- गोल्ड, अक्षय कुटे- सिल्वर, आकाश गायकवाड- ब्रांझ. मुलींमध्ये मेघा खारतोडे- गोल्ड, साक्षी आवारे- सिल्वर, तनुजा आहेर- ब्राँझ. या विद्यार्थ्यांनी नंबर मिळविणे तसेच शाळा अंतर्गत विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षक कैलास पातळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

फेसबुक पेज लाईक करा –