Satara : ताल-सुरांच्या निनादात औंधमध्ये रंगणार संगीत महोत्सव

औंध : पोलीसनामा ऑनलाईन – ताल- सुरांच्या निनादात औंध संगीत महोत्सवाला रविवारी (दि. 22) प्रारंभ झाला.डोंबवली येथील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पध्दतीने हा महोत्सव साजरा केला जात आहे.

ग्वालेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडीत अनंतबुवा जोशी यांनी गुरु शिवानंद स्वामी यांच्या स्मरणार्थ औंध (ता. खटाव) येथे 1940 पासून हा महोत्सव सुरु केला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने हा उत्सव ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील सर्व कलाकरांची सादरीकरण औंध संगीत महोत्सव फेसबुक पेजवरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक फेजवरून व यु-ट्युब वरून प्रसारीत करण्यात येत आहेत. सकाळच्या सत्राची सुरुवात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने झाली. त्यांना विश्वनाथ शिरोडकर यांनी तबला साथ दिली. संध्याकाळच्या सत्राची सुरुवात प्रसिध्द गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. तर महोत्सवाची सांगता हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होणार आहे. महोत्सवाचे 80 वे वर्षे असून महोत्सवात आतापर्यंत भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी, पंडीत जितेंद्र अभिषेकी, गिरीजादेवी, उस्ताद सुलतान खा आदी दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली आहे.