‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेंतर्गत जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पत्रकार व शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्तविद्यमाने कोरोनाला हद्दपार करून स्वत: बरोबरच कुटुंबाचे रक्षण करण्याच्यादृष्टीने शनिवार दि.१ ० रोजी शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेंतर्गत जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरूर तहसिल कार्यालयाचे महसुल नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार यांच्या हस्ते प्रारंभ करून स्वच्छतेची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी देण्यात येणा-या सुचना व नियम यांसह मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी हात साबने स्वच्छ धुणे, सॅनिटाझर वापरणे, गर्दि न करणे यांसह प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी देण्यात येणा-या सुचना व नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करून कोरोनापासुन स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आडवाटेचे पारनेर टिमने पथनाट्याच्यामाद्यमातुन प्रा .तुषार ठुबे, प्रा. ओमप्रकाश देंडगे, निवृत्ती श्रींमंदिलकर, अशोक गायकवाड, शाहीर दत्ता जाधव, सोमनाथ चौधरी, मोहन माने, संकेत ठाणगे, संदीप बाबर, विकास खाडे, उत्कर्ष झावरे, विनोद ठुबे, महाबली मिसाळ, काशिनाथ सूर्यवंशी, श्रद्धा ढवण, आरती बेलोटे, कोमल पवार, माधुरी चत्तर आदिंनी जनजागृती केली तर स्वच्छतेविषयी गारबीज क्लिनिकचे प्रविण नायक यांनी माहिती सांगितली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर, संतोष शिंदे, प्रविण गायकवाड, बाळासाहेब ढोबळे, अर्जुन बढे, धर्मा मैड, भगवान श्रीमंदिलकर, किरण चाैधरी, रमेश देशमुख, भाऊसाहेब खपके, गजानन गावडे आदि पत्रकार उपस्थित होते.