रंगभूमी दिनानिमित्त ‘स्वर प्रभात’ कार्यक्रमाचे आयोजन 

अंबाजोगाई : पोलीसनामा आॅनलाइन  – अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘स्वर प्रभात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीरंग सुरवसे यांच्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अंबाजोगाई शहरातील चौसाळकर कॉलनी येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम रंगला.

अ. भा. नाट्यपरिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने दरवर्षी मराठी रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ‘स्वर प्रभात’चे आयोजन करण्यात आले होते. यात श्रीरंग सुरवसे यांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. सर्व प्रथम विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. नटराज पूजन करून कार्यक्रमास नांदी नाट्यगीते तसेच ग.दी.माडगूळकरांच्या शताब्दी वर्षानिमित्त गीत रामायणातील अनेक पदे सुरवसे यांनी सादर केली.

सिंचन घोटाळा : पाच आरोपी दोषमुक्त, एसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह 

यावेळी अभंग आणि भक्तीगीत श्रीपाद खारकर आणि रवी पांडे यांनी सादर केले. तर संवादिनी साथ बी. के. पांडे, तबला साथ निलेश मस्के यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन संपदा कुलकर्णी यांनी केले. यावेळी ग.दि.मा.,पु. ल. देशपांडे,आणि सुधीर फडके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विषयी त्यांनी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे निवेदन कृष्णा भोकरे यांनी केले. आभार सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमचे परिषदेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि परिसरातील सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी सुनील व्यवहारे, माऊली किर्दंत, अविनाश देशपांडे, प्रदीप कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us