राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन

जुन्नर (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यशाळेचे उपयोग नक्कीच होईल असे कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी सांगितले.

या कार्यशाळेला दीपक हरणे, विभागीय अधिकारी, एमटीडीसी, पुणे विभाग, श्री. सचिन म्हस्के, शाखा प्रबंधक, आय डी बी आय बँक, श्री. शशिकांत जाधव, संचालक, आमंत्रण कृषी पर्यटन, श्री. मनोज हाडवळे, पराशर कृषी पर्यटन, श्री. गणेश चप्पलवार, संचालक, कृषी पर्यटन विश्व पुणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.

या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन भविष्य आणि डिजिटल मार्केटिंग, जाहिराती, सोशल मीडिया या महत्वाच्या गोष्टी शिकता येईल. या कार्यशाळेचे सशुल्क नोंदणी ७ मार्चच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक ९ आणि १० मार्च २०१९ रोजी पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजूरी, आळेफाटा, नाशिक रोड, पुणे येथे होणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ८८८८५५९८८६ या नंबरवर संपर्क साधा.