“वॉटर टॉक सिरीज २०१८” या उपक्रमाचे आयोजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या वतीने “वॉटर टॉक सिरीज २०१८” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. हा उपक्रम १ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत संपन्न होणार आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd601ff4-ab8e-11e8-9e9a-f72650e04010′]

दरवर्षी वॉटर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या विभागाच्या माजी विध्यार्थींच्या पुढाकाराने ह्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे सामाजिक , विश्लेषणात्मक, पर्यावरणपूरक दृष्टिकोन तयार व्हावा हे एकमेव उद्धेश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. हेच विध्यार्थी भविष्यात देशासमोरील “पाणी प्रश्नांची” आव्हाने स्वीकारू शकतील अशी अाशा विभागाकडून व्यक्त केली जाते.
या वर्षीचा “वॉटर टॉक सिरीज” उपक्रम हा ” देशातील पाणी-ताण मर्यादित करण्याच्या संकल्पना” यावर आधारित आहे. देशातील “शहरी व ग्रामीण भागातील तळागाळातील पाणी धोरण” या विषयी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध 

डेहराडून येथील पीपल सायन्स इन्स्टिट्युटचे माजी संचालक डॉ. रवी चोप्रा हे ” पाणी व्यवस्थापनामध्ये शासनाची भूमिका” या विषयावर आपले मत व्यक्त करणार आहेत. तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी हे “पाणी व्यवस्थापनाचे नियमन” या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. हिमांशू कुलकर्णी हे “पाणी-ताण कमी करण्यासाठी भूजल व्यवस्थापनाची भूमिका” या विषयीची माहिती देणार आहेत. आणि के.जे. जॉय हे “पाणी-ताणाचा सामाजिक व पर्यावरणीय गाभा” आपल्याला समजावून सांगणार आहेत. अशी माहिती विभागाचे सह-प्राध्यापक सचिन तिवले यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन 

You might also like