Coronavirus : PM Cares साठी रविंद्र जाडेजाच्या पत्नीनं केली 21 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशात उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. मात्र, कोरोनाच्या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता कोरोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे. क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिनेदेखील कोरोनाग्रस्तांना 21 लाखांची मदत केली आहे.

कोरोनाच्या लढ्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर रोहित शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिने कोरोनाग्रस्तांसाठी 21 लाखांची मदत केली आहे. तसेच नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. याआधी रोहित शर्माने 80 लाखांची मदत केली आहे. अनुष्का आणि विराट यांनीही पीएम-केयर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीला (महाराष्ट्र) साथ देणार असल्याचे सांगितले. तसेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी 25 लाख, बीसीसीआयने 51 कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने 50 लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.