लहान बाळांना ORS चं पाणी देताय ? एकदा ‘हे’ नक्की वाचा

ऋतु बदलला किंवा पावसाळा सुरू झाला तर अनेकदा बाळाला डिहायड्रेशन होतं. त्यामुळं अनेक महिला मुलांना ओआरएस (Oral Rehydration Solutions – ORS) देतात. परंतु मुलांना ओआरएस देण्याचीही एक पद्धत आहे. त्यामुळं लहान मुलांना ते देताना खूप काळजीपूर्वक द्यावं लागतं.

ORS चा वापर कसा करावा ?

1) ओआरएसची पावडर उकळून गार केलेल्या पाण्यात घालावी. पावडर पाण्यात टाकल्यानंतर ती पूर्णपणे विरघळून जाईल याची काळजी घ्यावी. तसंच बाळाला हे देताना फीडर किंवा ड्रॉपरचा वापर करावा. बाटलीद्वारे ओआरएस देणं टाळावं.

2) प्रत्येक वयोगटानुसार ओआरएस सेवनाचं प्रमाण हे भिन्न असू शकतं. ओआरएस सुरक्षित आहे आणि सर्वच वयोगटासाठी त्याचा उपयोग केला जातो.

3) बाळाला उलट्या झाल्या तर त्याच्या पोटात अन्न नसल्यानंही बाळ डिहायड्रेट होऊ शकतं. अशा वेळी पालकांनी बाळाला ओआरएस पाजावं. एकाच वेळी ग्लासभर ओआरएस पाजण्यापेक्षा थोड्या अंतरानं पाजणं उत्तम ठरतं. जर 48 तासात बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर मात्र बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं.

अतिसार किंवा उलट्या झालेल्या मुलांसाठी वरदान ठरू शकतं ओआरएस

ओआरएसमध्ये सोडियम, पोटॅशियम, साखर आणि शरीराला आवश्यक असलेल्या इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाईट्सचा समावेश अशतो. अतिसार किंवा उलट्या झालेल्या मुलांसाठी ओआरएस वरदान ठरू शकतं. बाळाच्या शरीरातील द्रव पदार्थांचं प्रमाण कमी झाल्यानंही बाळ डिहायड्रेट होऊ शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.