प्रसिद्ध ‘कॉमेडियन’ बीनचं अपघातात निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस हॉलिवूड अ‍ॅक्टर आणि कॉमेडियन ऑरसन बीन यांचं 91 व्या वर्षी निधन झालं आहे. लॉस एंजिलिसमध्ये रोडअपघातात बीन याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

ऑरसन लॉस एंजिलिसमध्ये रस्ता क्रॉस करत होते. त्यावेळी अचानक एका वेगवान कारनं त्यांना उडवलं आणि ते खाली पडले. यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या कारनंही त्यांना धडक दिली ज्यात ऑरसन यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडली तेव्हा त्यांची 27 वर्षीय पत्नी अ‍ॅक्ट्रेस एले मिल्स ही तिथेच उपस्थित होती. तिथे असलेली गर्दी आणि दोन्ही कारच्या ड्रायव्हरनं त्यांची मदत केली. परंतु ऑरसननं जागीच दम तोडला होता. ऑरसन यांचे अनेक चाहते आणि इतरही हॉलिवूडमधील कलाकार त्यांना श्रद्धांजली वहात आहते. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

ऑरसनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा फेमस गेम शो टु टेल द ट्रुथ, डॉ क्वीन, मेडिसिन वुमेन यासाठी ते ओळखले जाते.