ट्रम्प यांचा पराभव झाल्यास पुन्हा होईल 9/11 सारखा हल्ला, ओसामाच्या भाच्चीनं सांगितलं

नवी दिली : वृत्तसंस्था – अल कायदा प्रमुख आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाचीने म्हटले आहे की, जर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले तर ९/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो. ओसामाची भाची नूर बिन लादेनने ट्रम्प यांच्या समर्थनार्थ असे म्हटले आहे. ती म्हणाली की, अमेरिकेची सुरक्षा फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्पच करू शकतात, जो बिडेन नाही.

नूर बिन लादेनने एका मुलाखतीत इशारा देत म्हटले की, अमेरिकेला डाव्या सरकारची गरज नाही. जो बिडेन यांच्यावर निशाणा साधताना नूर लादेन म्हणाली की, बिडेन यांचे सरकार आले तर ते जातीय भेदभावाला चालना देईल. ते अमेरिकेचे संरक्षण करू शकणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प हे या कामासाठी योग्य व्यक्ती आहेत.

ट्रम्प यांच्या आधी ओबामा सरकार होते असे नूर लादेन म्हणाली. त्यावेळी बराक ओबामा आणि जो बिडेन एकत्र सरकार चालवू शकत नव्हते. त्यावेळी हे दोघे मिळून एक डावे सरकार चालवत होते. त्यांच्या कार्यकाळातच इसिसचा जगभर विस्तार झाला आणि तो युरोपपर्यंत पोहोचला.

आपल्या काकांच्या बदनामीमुळे नूर बिन लादेनने आपले नाव बदलून नूर बिन लादिन असे करून घेतले आहे. नूरने ती ट्रम्प यांना पाठिंबा का देते हे सांगितले. ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिका सुरक्षित आहे, असे नूर म्हणाली. कारण ट्रम्प सरकारने देशाला बाह्य धोक्यांपासून वाचवले आहे.

नूर म्हणाली की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुळावर हल्ला केला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूक जिंकली पाहिजे, कारण त्यांचे सरकार केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण पाश्चात्य संस्कृती वाचवण्यासाठी आवश्यक आहे.

जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनला ओबामा सरकारने ठार केले होते. त्यावेळी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी जो बिडेन होते, जे सध्या डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आहेत.