OSCAR 2020 : समारंभात हॉलीवूडच्या सिनेमांचा ‘जलवा’, सॅम मेंडेसच्या 1917 नं जिंकली आतापर्यंत 3 ‘ऑस्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 92 व्या ऑस्कर अवॉर्ड्सला सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये या अवॉर्ड फंक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील अनेक सिनेमे या शोमध्ये आपला जलवा दाखवत आहेत. नॉमिनेशन्समध्ये यावेळी हॉलिवूड, जोकर आणि आयरिशमॅन यांची जादू दिसत आहे.

सॅम मेंडेस दिग्दर्शित सिनेमा 1971 ला 3 ऑस्कर अवॉर्ड्स मिळाले आहेत. बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, बेस्ट साऊंड मिक्सिंग असे 3 ऑस्कर देण्यात आले आहेत. हा सिनेमा पहिल्या महायुद्धावर आधारीत आहे.

हॉलिवूडचे लिजेंडरी सिनेमॅटोग्राफर रोजर डिकिन्सचं कॅमेरा वर्क कमाल आहे. त्यांचं हे 15 वं नॉमिनेशन होतं. त्यांनी अद्याप दोन ऑस्कर जिंकले आहेत.

याशिवाय स्टार वॉर्स, वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड यांसारखे सिनेमे साऊंड एडिटींगसाठी नॉमिनेट झाले होते. डोनाल्ड सिल्व्हेस्टर हा अवॉर्ड घेण्यासाठी आले होते. हो डोनाल्डचं पहिलं ऑस्कर नॉमिनेशन होतं आणि पहिल्याच वेळेत ते ऑस्कर जिंकण्यात यशस्वी झाले.

साऊथ कोरियाच्या पॅरासाईट या सिनेमाला बेस्ट फिचर फिल्मचा अवॉर्ड देण्यात आला. हा अवॉर्ड प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस पेनोलोपे क्रूज यांच्याकडून देण्यात आला. शोच्या सुरुवातीला ब्रॅड पिटनं ऑस्कर घेतला. हा त्याच्या करिअरमधील अ‍ॅक्टर म्हणून पहिला ऑस्कर अवॉर्ड होता.

अ‍ॅक्ट्रेस लायोरा डेन हिनं मॅरेज स्टोरी या सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा ऑस्कर अवॉर्ड घेतला. हे तिच्या करिअरमधील तिसरं नॉमिनेशन होतं.

जॅकलीन डुरेनला सिनेमात लिटल वुमेनसाठी बेस्ट कॉस्ट्युम डिझाईनचा अवॉर्ड मिळाला. बार्बरा लिंग हिनं वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड या सिनेमासाठी बेस्ट प्रॉडक्शन डिझाईनचा अवॉर्ड आपल्या नावावर केला. नॅन्सी हायला बेस्ट सेट डेकोरेशनसाठी अवॉर्ड मिळाला आहे.

The Nieghbor’s Window या सिनेमानं बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म साठी ऑस्कर जिंकला.

साऊथ कोरियन स्क्रिप्टरायटर्स बोंग जुन हो आणि हान जिन हो यांच्या पॅरासाईट या सिनेमाला बेस्ट ओरिजिनल स्क्रिनप्लेसाठी ऑस्कर देण्यात आला आहे. तैका वेतीती यांनी दिग्दर्शित केलेल्या जोजो रॅबिटला बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रिनप्लेचा अवॉर्ड देण्यात आला आहे. डिज्नीचा सिनेमा टॉय स्टोरीला बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्मसाठी अवॉर्ड देण्यात आला आहे. हेअर लवनं बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर देण्यात आला आहे.