Oscar Awards 2023 | ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने पटकावला ऑस्कर पुरस्कार; भारताला पहिल्यांदाच गाण्याने मिळवून दिला ऑस्कर

पोलीसनामा ऑनलाइन : Oscar Awards 2023 | गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगासोबतच भारतीयांचे देखील ऑस्कर पुरस्काराकडे लक्ष लागून होते. अखेर हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खूपच खास होता. या पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. तर आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. पहिल्यांदाच या कॅटेगरीत भारताने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. (Oscar Awards 2023)

बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरी नॉमिनेशन मध्ये अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमन), होल्ड माय हँड (टॉप गन मॅव्हरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि दिस इज ए लाइफ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स) या गाण्यांचा देखील समावेश होता. या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटू’ या गाण्याने हा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. (Oscar Awards 2023)

हा पुरस्कार संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन स्वीकारला. यावेळी किरावानी म्हणाले, “मी आजपर्यंत कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे. यावेळी किरावानी यांनी मंचावर एक गाणं देखील म्हटले आहे. तर RRR चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका पादुकोण भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

Advt.

Web Title :- Oscar Awards 2023 | rrr song naatu naatu wins oscar 2023 in best original song category

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू