×
Homeताज्या बातम्याOscar Nomination 2023 | आज होणार ऑस्करच्या नामांकनाची घोषणा; भारतात कधी व...

Oscar Nomination 2023 | आज होणार ऑस्करच्या नामांकनाची घोषणा; भारतात कधी व कुठे पाहता येणार हा सोहळा?

पोलीसनामा ऑनलाईन : सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची (Oscar Nomination 2023) सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2023 च्या नामांकनांची घोषणा आज 24 जानेवारी रोजी संध्याकाळी कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. (Oscar Nomination 2023)

ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अ‍ॅलिसन विल्यम्स हे हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. ऑस्कर 2023 च्या नामांकन सोहळ्याचं थेट प्रसारण केलं जाईल. तुम्हाला Oscars.org, Oscar.com , युट्यूब, ट्विटर आणि फेसबूकवर हा सोहळा लाइव्ह पाहता येईल. (Oscar Nomination 2023)

95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनं 24 जानेवारी रोजी घोषित केली जातील, तर ऑस्कर सोहळा हा 12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाईल.
यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिमी किमेल करणार आहेत.
ऑस्कर- 2023 साठी भारताकडून ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका
म्हणून पाठवण्यात आले आहे. या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
तर ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत दिग्दर्शक पान नलिन यांचा ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचा
देखील समावेश झाला. तसेच ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटांचा देखील समावेश आहे.

Web Title :-Oscar Nomination 2023 | oscars 2023 nominations event today where to watch online in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Supriya Sule | ‘माझ्या भोळेपणाचा ‘त्या’ नेत्याने फायदा घेतला, मला उल्लू बनवलं!’ – सुप्रिया सुळे

Must Read
Related News