BAFTA च्या ‘ब्रेकथ्रू इंडिया’च्या उपक्रमाचा अ‍ॅम्बेसेडर बनला ऑस्कर विजेता संगीतकार AR रहमान

पोलिसनामा ऑनलाइन – ऑस्कर विनर संगीतकार ए आर रहमान (A. R. Rahman) ला सोमवारी ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (British Academy of Film and Television Arts – BAFTA) च्या ब्रेकथ्रू इनिशिएटीव्ह (इंडिया) चा अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं.

नेटफ्लिक्स (Netflix) नं समर्थन केलेल्या उपक्रमाचा हेतू भारतात सिनेमा, क्रिडा किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील 5 प्रतिभावान लोकांना शोधणं आणि त्यांना त्यांची प्रतिभा आणि निखरण्यास मदत करणं आहे. रहमान म्हणाला की, तो बाफ्टा सोबत काम करण्यासाठी आणि नव्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठी उत्सुक आहे.

एका स्टेटमेंटमध्ये रहमान म्हणाला, प्रतिभावान कलाकारांसाठी ही मोठी संधी आहे. बाफ्टा विजते आणि प्रसिद्ध व्यक्तींकडून सल्ला घेण्याासाठीही यात चांगला चान्स आहे.

एका रिपोर्टनुसार बाफ्टा ब्रेकथ्रू इंडिया च्या माध्यमातून ब्रिटीश कलाकार आणि भारतातील प्रतिभा यांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यास मोठी मदत होणार आहे.

You might also like