Oscars 2022 Winners List | समोर आली ‘Oscar 2022’ विजेत्यांची पूर्ण यादी, जाणून घ्या भारताच्या झोळीत काय पडलं ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 27 मार्च रोजी लॉस एंजिलेसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 94 व्या ऑस्कर अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होत. तर नुकतीच ऑस्कर जिंकणाऱ्या सगळ्या विजेत्यांची यादी (Oscars 2022 Winners List) समोर आली आहे. तसेच या वर्षी सगळ्यात जास्त नॉमिनेशन नेटफ्लिक्सच्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या सिरिजला मिळाले. त्यानंतर फिल्म ड्यूनला 2022 च्या ऑस्करमध्ये एकूण 10 कॅटेगिरीमध्ये नॉमिनेट केलं आहे (Oscars 2022 Winners List).

जगभरात ऑस्कर 2022 चं एबीसी आणि 200 पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये प्रदर्शन करण्यात आलं. भारतामध्ये हे अवॉर्ड फंक्शन 28 मार्च रोजी सकाळी 5 वाजल्या पासून सुरू झालं होतं. एमी श्यूमर (Amy Schumer) आणि वांडा स्काय (Wanda Skyes) यांनी या शोचं सुत्रसंचालन केलं होत. भारताकडून ‘रायटिंग विद फायर (Writing With Fire)’ ही डॉक्यूमेंटरी फिल्म ऑस्करमध्ये सहभागी झाली होती (Oscars 2022 Winners List). तर जाणून घेऊया अखेर कोणाकोणाला ऑस्करचा किताब मिळाला –

 

File photo

 

 

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट फिल्म / सिनेमैटाग्राफी – कोडा फिल्म टीम

बेस्ट फिल्मचा (Oscars 2022 Best Film) किताब कोडा (Coda) या चित्रपटानं पटकवला. या चित्रपटाच्या कथेत एका कुटूंबातील 4 लोक आहेत. यामधील 3 लोकांना कानाने ऐकू येत नसते, तर चौथा संगीत क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितो. त्यासाठी तो अनेक कॉन्सर्टमध्ये सहभागी सुद्धा होतो.

 

File photo

 

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट अभिनेता – विल स्मिथ

बेस्ट अभिनेत्यासाठी (Oscars 2022 Best Actor) या वर्षी चित्रपट ‘किंग रिचर्ड (King Richard)’ मधील सुपरस्टार विल स्मिथ (Will Smith) यानं ऑस्कर आपल्या नावे केला आहे.

 

File photo

 

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट अभिनेत्री – जैसिका चैस्टेन

फिल्म ‘द आई टैमी फाये (The Eyes Of Tammy Faye)’ साठी अभिनेत्री जैसिका चैस्टेननं (Jessica Chastain) बेस्ट अभिनेत्रीचा (Oscar 2022 Best Actress) किताब मिळवला आहे.

 

File photo


बेस्ट डायरेक्टर – जेन कैंपियन

जेन कैंपियनला (Jane Campion) ‘द पॉवर ऑफ डॉग (The Power Of Dog)’ या नेटफ्लिक्सच्या सिरिजसाठी बेस्ट दिग्दर्शक (Oscars 2022 Best Director) हा पुरस्कार मिळाला आहे.

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म – ड्राईव्ह माय कार

‘ड्राईव्ह माय कार (Drive My Car)’ या जपानी फिल्मला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म अवॉर्ड मिळाला आहे
(Oscar Best International Feature Film).

 

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट लाईव्ह एक्शन शॉर्ट फिल्म –

‘द लॉन्ग गुडबाय (The Long Goodbye)’ या चित्रपटानं बेस्ट लाईव्ह एक्शनशॉर्ट फिल्मचा
(Oscars 2022 Best Live Action Short Film) ) पुरस्कार पटकवला आहे.

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट फिल्म एडिटिंग –

‘ड्यून (Dune)’ या चित्रपटासाठी जो वॉकरला (Joe Walker) बेस्ट फिल्म एडिटिंग बेस्ट
(Oscars 2022 Best Film Editing) किताब मिळाला आहे.

ऑक्सर अवॉर्ड्स बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर – जेनी बेवन

जेनी बेवन (Jenny Beavan) हिला ‘क्रुएला (Cruella)’ या फिल्ममधील कॉस्ट्यूमसाठी बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर
(Oscars 2022 Best Costume Design) हा अवॉर्ड मिळाला आहे.

web title : Oscars 2022 Winners List | oscars 2022 full list of winners check out here hollywood news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा