Oscars Awards Winners List 2023 | यंदाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या श्रेणीत कोणाला मिळाला ? जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

पोलीसनामा ऑनलाइन : Oscars Awards Winners List 2023 | प्रतिष्ठित असा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्कर पुरस्कार हा केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगभरातील कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी मानाचा पुरस्कार समजला जातो. या पुरस्काराला वृद्धांपासून ते बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात विशेष असे स्थान आहे. यंदाचा ऑस्कर 2023 हा पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खूपच खास होता. भारताकडून ऑस्करसाठी चार नामांकन गेली होती.

निकालानुसार भारताला पहिला ऑस्कर “The Elephant Whispers” या शॉर्ट फिल्मला मिळाला. या शॉर्ट फिल्मला बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.पहिल्यांदाच या कॅटेगरीत भारताने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. (Oscars Awards Winners List 2023)

ऑस्कर 2023’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट सिनेमा – एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’
बेस्ट फिल्म एडिटिंग : ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’
बेस्ट साऊंड – टॉप गन: मेव्हरिक

बेस्ट अ‍ॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स
बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म – द एलिफंट व्हिस्पर्स
सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गाणे)- नाटू, नाटू…, संगीत एम.एम. कीरवाणी; चंद्रबोस यांचे गीत
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल – द वेल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – जेम्स फ्रेंड
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म – आयरिश गुडबाय
बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म – नवलनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो

Web Title :- Oscars Awards Winners List 2023 | oscars 2023 95th academy awards winners list

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

Old Pension Scheme In Maharashtra | कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन