Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Osmanabad ACB Trap | लोहारा पोलीस ठाण्यात (Lohara Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी आरोपीकडून वीस हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस नाईक गोरोबा इंगळे (Police Naik Goroba Ingle) याला उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उस्मानाबाद एसीबीने (Osmanabad ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सकाळी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

लोहारा पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल आहे. दरम्यान या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअपमध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे यासाठी पोलीस नाईक गोरोबा इंगळे यांनी तक्रारदाराकडे बुधवारी (दि.3) 25 हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap) तक्रार केली.

 

प्राप्त तक्रारीची पडताळणी करुन आज (गुरुवार) सकाळी लोहारा-जेवळी रोडवरील एका पेट्रोलपंप परिसरात एसीबीने सापळा रचला.
यावेळी पोलीस नाईक इंगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून वीस हजार रुपये लाच स्विकारली असता पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते (Deputy Superintendent of Police Prashant Sampte),
पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Osmanabad ACB Trap | a bribe of 20000 was taken not to arrest the criminal police naik arrested red handed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Patra Chawl Scam | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने पाठवले समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

 

Pune Pimpri Crime | दारुचा ग्लास सांडला म्हणून मित्राचा खून, मृतदेह फेकला कचऱ्यात; हिंजवडी पोलिसांकडून दोघांना अटक

 

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता