Osmanabad ACB Trap | 5 लाखाच्या लाच प्रकरणी उस्मानाबादच्या सहाय्यक रचनाकार मयुरेश केंद्रेला (मुळ रा. लातूर) अॅन्टी करप्शनकडून अटक, दीड लाख घेताना रंगेहाथ पकडलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Osmanabad ACB Trap | 120 गुंठे जमीन अकृषी Non Agricultural (NA Land) करण्याच्या प्रस्तावास तात्पुरती मंजुरी देण्यासाठी 6 लाखाच्या लाचेची मागणी (Demand Of Bribe) करून तडजोडीअंती 5 लाख रूपयांची लाच मान्य करून त्यामधील पहिला हप्ता म्हणून दीड लाख रूपये घेताना उस्मानाबाद नगर रचना कार्यालयातील (Town Planning Office Osmanabad) सहाय्यक रचनाकार (Assistant Creator) मयुरेश माणिकराव केंद्रे
Mayuresh Manikrao Kendre (30, मुळ रा. सिध्देश्वर हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. 24, कालिका देवी मंदिराच्या बाजूला, जुना औसा रोड, लातूर) याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याला आता अटक करण्यात आली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Osmanabad ACB Trap)
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची मौजे शिंदफळ (ता. तुळजापूर – Tuljapur) येथील शेत जमीन गट नंबर 187 मधील 120 गुंठे जमीन अकृषी करण्यासाठीच्या प्रस्तावास तात्पुरती मंजुरी (Lay Out Tentative) देण्यासाठी सहाय्यक रचनाकार मयुरेश केंद्रे याने सुरूवातीला 6 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 5 लाख रूपयांमध्ये मांडवली झाली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी उस्मानाबादच्या अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 29 मार्च 2023 रोजी ठरलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रूपयाची लाच घेताना मयुरेश केंद्रेला सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला अटक (Osmanabad Crime News) करण्यात आली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Osmanabad ACB Trap)
औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अप्पर अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सिध्दराम म्हेत्रे (DySP Siddram Mhetre),
पोलिस निरीक्षक विकास राठोड (PI Vikas Rathod), पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख,
विष्णू बेळे, विशाल डोके, सचिन शेवाळे,
अविनाश आचार्य आणि चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने सापळा कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. (Osmanabad Bribe Case)
Web Title :- Osmanabad ACB Trap | Osmanabad Town Planning Officer assistant designer Mayuresh Kendre (native of Latur) arrested by anti-corruption in bribery case of 5 lakhs, caught red-handed while taking 1.5 lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update