Osmanabad ACB Trap | कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून 70 हजार रुपये लाच घेताना पोलीस पाटील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू उत्खननाचा ठेका मिळालेल्या एका तरुण ठेकेदाराला (Sand Contractor) कारवाई करण्याची धमकी (Threatening Action) देत ढगपिंपरी येथील पोलील पाटलाने (Police Patil) 2 लाख रुपये लाचेची मागणी (Demand a Bribe) केली. यापैकी 70 हजार रुपये लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Osmanabad ACB Trap) पोलीस पाटलास रंगेहाथ (Accepting Bribe) पकडले. उस्मानाबाद एसीबीच्या पथकाने (Osmanabad ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.24 केली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका 26 वर्षाच्या ठेकेदाराने उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap) 9 मार्च 2023 रोजी तक्रार केली होती. शुक्रवारी पडताळणी करुन पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे Haridas Limbaji Havele (वय 51, रा. ढगपिंपरी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याला लाच घेताना अटक (Arrest) केली.
तक्रारदार यांना परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदी (Chandni River) पात्रातील वाळू उत्खनन करण्याचा लिलाव मिळाला होता. या वाळू घाटावर नियमबाह्य उत्खनन होऊ नये, याच्या पाहणीसाठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे हे सदस्य आहेत. हावळे यांनी तक्रारदार यांना तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय, त्याचे फोटो काढून महसूल विभागाला (Revenue Department) पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितली. तडजोडी अंती 9 मार्च रोजी 70 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
दरम्यान, वाळू ठेकेदाराने पोलीस पाटलाची उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी करुन शुक्रवारी ढगपिंपरी येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 70 हजार रुपये लाच घेताना पोलीस पाटील हरिदास हावळे याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
उस्मानाबाद पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे (PI Ashok Hulge),
पोलीस अमलदार विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Osmanabad ACB Trap | Police Patil arrested while taking bribe
of 70 thousand rupees from sand contractor threatening action
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update