निवडणूक प्रचारासाठी ‘या’ जिल्ह्यातील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताच, प्रचारासाठी, सभेसाठी कार्यकर्ते पुरवण्यासाठी उस्मानाबाद येथील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल लढवली आहे. आवश्यक तेवढे महिला पुरुष कार्यकर्ते मिळतील अशी पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून प्रदर्शित केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षातील उमेदवारांना प्रचारासाठी कार्यकत्यांची आवश्यकता असते . कार्यकर्ते कोठून आणायचे असा प्रश्न अनेकदा उमेदवारांना पडलेला असतो. याचदरम्यान, उस्मानाबादमधील दोन मजूर सोसायट्यांनी निवडणुकांमध्ये प्रचार आणि सभेसाठी आवश्यक तेवढे कार्यकर्ते मिळतील अशी जाहिरात प्रदर्शित केली आहे. इतकेच नव्हे तर, हीच जाहिरात फेसबुकच्या माध्यमातूनही प्रदर्शित केली आहे.

विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांना कार्यकर्ते हवे असतील त्यांना या सोसायट्यांकडे नोंदणी करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्षांना किंचीत कमी दोन हजार कार्यकर्ते आणि या पेक्षा जास्त हवे असतील तर हवे तेवढे कार्यकर्ते पुरवले जातील , असेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर प्रत्येक कार्यकर्त्याला १ हजार रुपये प्रतिदिवस मजुरी द्यावी लागेल असेही त्यांनी म्हंटले. कोणत्याही उमेदवाराला कार्यकर्ते हवे असतील तर त्या जाहिराती खाली त्यांनी आपले मोबाईल नंबरही दिले आहेत.

https://www.facebook.com/balasaheb.subhedar.52/posts/556574921530689