कळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘अव्वल’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळतेय तसेच राज्यातच नव्हे तर देशभरात हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय मात्र या सगळ्यात वेगळा ठरलाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका तालुक्यात एक हजार मुलांच्या मागे एक हजार नऊ मुलींची संख्या झाल्याने सध्या मुलींचा जन्मदर वाढलेला पाहायला मिळत आहे पाहुया याबाबतचा एक खास वृत्तांत.

मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी क्रेंद व राज्य शासनाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हजार मुलीमागे एक हजार 9 मुलींचा जन्मदर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुका हा अव्वल असल्याचे स्पष्ट झालय. कळंब तालुक्यात 2015 पर्यत मुलींचा जन्मदर घटला होता. आरोग्य विभागाच्या पाहणीत दर हजार पुरूषामागे मुलींचा जन्मदर सुमारे दोनशे ने कमी होता. आता स्थिती बदलली असुन हजार मुलांमागे एक हजार नऊ मुलींचा जन्मदर झालाय.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदरात कळंब तालुका अव्वल असल्याचे कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांनी सांगितलय. कळंब तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. केंद्र व राज्य सरकारने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कायदे केले आहेत. जनजागृती साठी व्यापक मोहीम राबविण्यात येतात. स्ञीभ्रुणहत्या थांबवणे, मुलींचे शिक्षण, सुरक्षितता, मुलींप्रती समाजात स्वागताची भावना निर्माण करणे, बालविवाह रोखणे तसेच मुला मुलींचा जन्मदर समान ठेवणे आदी उद्दिटांच्या पुर्ततेसाठी महीला व बालविकास विभागाने राज्यात सुकन्या योजना सुरू केली आहे.

त्यानंतर या योजनेचे माझी कन्या भाग्यश्री मध्ये करण्यात आले. एकंदरीत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवुन प्रयत्न करण्यात आले. गर्भलिंग निदानासंदर्भात कठोर कायदा केल्याने गर्भपाताचे प्रमाण शुन्य टक्कांवर आले. त्यामुळे मुलींच्या जन्मदारात मोठी वाढ झाल्याने सामाजिक मानसिकतेत बदल होत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत करावे असे मत एका नवोदित मुलीच्या आईने व्यक्त केले. कळंब तालुक्यातील हे वाढते गुणोत्तर सध्या कळंब तालुक्यासाठी अभिमानाची बाब बनली असुन कळंब तालुक्या प्रमाणेच इतर तालुक्यानीही मुलींच्या जन्माचे स्वागत करण गरजेच आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like