उस्मानाबाद : शंभु महादेव कारखान्याच्या चेअरमनसह 7 जणांवर फसवणूकीचा FIR दाखल

कळंब, पोलीसनामा ऑनलाइन – परळी वैद्यनाथ अर्बन को-आप बॅकेकडे 27 कोटी 37 लाख रुपयांची साखर परस्पर विक्री केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभु महादेव सहकारक कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामुळे मात्र, बिड आणि उस्मानाबाद जिलह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट (रा. पद्मावती गल्ली परळी वै, वैद्यनाथ) बंकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन (रा. स्वाती नगर हालगे गल्ली परळी वै), वै.अ.को-आप बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रसाद त्रिंबक राव कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद मुरलीधर खर्चे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मधुकर चितळे (रा. परळी), तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र गणपतराव कवठेकर (ह.मु. औरंगाबाद), मॅनेजर संजय पंढरीनाथ खंदारे, व दि. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळमधील कर्मचार्‍यांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात आपटेंसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे 50 कि.ल. मटरय तालुक्यातील हावरगाव येथील शंभु महादेव शुगर अन्ड अलाईड इंडस्ट्रीज आहे. कारखान्याची स्थापना सन 2000 मध्ये झाली आहे. कारखाण्याचे चेअरमन दिलीप आपेट आहेत.शंभु महादेव शुगर अन्ड अलाईट इंडस्ट्रीज लि. हावरगांव कारखाण्यासाठी चेअरमन दिलीपराव आपेट व कारखाण्याचे संचालक मंडळांनी कारखाण्यासाठी सन 2002 पासुन सन 2017 या कालावधी मध्ये वेळोवेळी तोडणी, वाहतुक, यंत्रणा उभारणीसाठी, शेतक-यांना ऊसबील देण्यासाठी साखर कारखाण्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर साखर तारण व कारखाणा मॉडगेज करून 46 कोटी 23 लाख रूपये कर्ज घेतले. सदरचे कर्ज हे कारखाण्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर व कारखाण्याच्या व इतर स्थावर मालमत्तेवर गहाणखताद्वारे देण्यात आले होते. सदरचे कर्ज देते वेळी दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन व शंभु महादेव साखर कारखाण्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांनी सदर साखर कारखान्यामध्ये सन 2017 मध्ये शंभु महादेव साखर कारखाना हावरगांव येथील साखरेच्या गोडाउनमध्ये 154177 एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणुन साखर साठा ठेवल्याचे दाखवले. सदरच्या तारण असलेल्या साखर साठयाच्या गोडाउनला दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेने स्वतःचे मालकीचे कुलपे लावून सील केलेले होते.

तसेच साखर साठयावर नियंत्रक म्हणुन स्थानिक बँक अधिकारी म्हणुन नियुक्त केले होते. तारण साखर साठयाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. साखर साठा खुल्या बाजारात विक्री करण्याचे बँक व साखर कारखाना यांच्यात करारामध्ये ठरले होते.

शंभु महादेव कारखाण्यास ज्यावेळेस सदरची साखर टेंडरद्वारे (जाहिर निवीदा काढून ) विक्री करावयाची आहे. त्या-त्या वेळी सदरचा कारखाना जेवढा साखर साठा विक्री करावयाचा आहे. तेवढया साखरेच्या रक्कमेचा भरणा वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी येथे किंवा दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. शाखा केज येथे या बँकेस करत होते.

त्यानंतर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे लेखी आदेशाने सदरचा भरणा केल्यानंतर भरणा केलेल्या रक्कमे इतका साखर साठा शंभु महादेव साखर कारखाना यांच्या मार्फतीने खरेदीदारास दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी चा शंभु महादेव साखर कारखाना हावरगांव येथे नियुक्त केलेला स्थानिक बँक अधिकारी मार्फतीने देण्यात येत होता.

चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांनी कारखाण्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर रित्या दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेकडे तारण असलेला साखर साठा परस्पर विक्री केला. गोडावूनमध्ये असलेला तारण साखर साठा 154177 पोते परस्पर विक्री करून 27 कोटी 23 लाख रूपयाचा अपहार केला. सदरचा अपहार जुलै 2017 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत झाला असल्याचे निदर्षनास आले आहे.