छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कळंब (उस्मानाबाद) :  पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कळंब येथे न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १९ फेब्रुवारी, २०२० रोजी पोलीस मैदान कळंब येथे करण्यात आले होते.

सदर सामन्याचे उदघाटन न्यायाधीश महेश ठोंबरे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, कळंब यांच्या हस्ते व कृष्णकांत काळे, व्यवस्थापक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया – शाखा कळंब, विधिज्ञ बी.एन.लोमटे, विधिज्ञ डी.एस.पवार, विधिज्ञ अमोल एन.कवडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत १. उस्मानाबाद, २. कळंब, ३. परंडा, ४. भूम, ५. तुळजापुर, व ६. कळंब संघ-२ असे एकुण सहा न्यायालयीन कर्मचारी संघांनी सहभाग घेतला होता. सदर सामन्यात प्रथम बक्षीस रु. ५,१००/- व करंडक कै. अ‍ॅड. नारायणरावजी लोमटे यांच्या स्मरणार्थ अ‍ॅड. बी.एन.लोमटे यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते. तर दुसरे बक्षीस रु. ३००१/- व करंडक अ‍ॅड. डी.एस.पवार यांच्यातर्फे व तिसरे बक्षीस रु. २००१/- व करंडक अ‍ॅड. श्री. ए.एन.कवडे, अध्यक्ष विधिज्ञ मंडळ, यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते.

अटीतटीच्या व चुरसीच्या झालेल्या सामन्यांमध्ये उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, दुसरे पारितोषिक कळंब न्यायालयीन कर्मचारी संघाने पटकावले. तर तिसरे पारितोषिक भुम न्यायालयीन कर्मचारी संघाने पटकावले.

बक्षीस वितरण कार्यक्रम न्यायाधीश महेश ठोंबरे, दिवाणी न्यायाधिश, क.स्तर, कळंब, श्री. कुडते, सहदिवाणी न्यायाधिश, क.स्तर, कळंब, राेहीत मुळे , सहाय्यक सरकारी अभियोक्ता कळंब, यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर सामने यशस्वी होण्यासाठी मोहन कोलंगडे, अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, विजय टोणगे, सईद सौदागर, संतोष भांडे, मच्छिंद्र लवांडे, रवी कोल्हे, सचिन गायकवाड,  विनोद भगत, सावनकुमार धामणगे, सुशिल चिंदाले, अश्वीन यादव, अंगद वाघ, बद्रुलहक्क सय्यद, सचिन काळे व इतर कर्मचारी बांधवांनी सहकार्य केले

You might also like