Homeउस्मानाबादOsmanabad Crime | संतापजनक ! जात पंचायतीने केले 'हे' घृणास्पद कृत्य; संपुर्ण...

Osmanabad Crime | संतापजनक ! जात पंचायतीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य; संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद शहरातील (Osmanabad Crime) काका नागर भागात राहणाऱ्या एका दांम्पत्यास समाजातून बहिष्कृत करीत त्यांना केलेला दंड वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या (Jaat Panchayat) पंचांनी अत्यंत घृणास्पद वर्तन केल्याचे समोर आले आहे. जातपंचायतीच्या त्रासाला वैतागून पतीने आत्महत्या (Committed suicide) केल्यानंतर पत्नीने आपल्या तक्रारीत पंचाचा पाढा वाचला असून, याप्रकरणी बुधवारी (दि.6) रात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) गुन्हा (FIR Lodged) दाखल करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हदरवणारी ही घटना उस्मानाबादमध्ये (Osmanabad Crime) समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

पळसप येथील सोमनाथ व सुनिता हे दांम्पत्य उस्मानाबाद शहरातील (Osmanabad Crime) काका नगरमध्ये (Kaka Nagar) वास्तव्याला होता. 8 वर्षापूर्वी त्यांच्याकडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने जातपंचायतीने त्यांना 4 एकर शेती व 7 लाख रुपये दंड ठोठावला होता. या पैश्यांच्या वसुलीसाठी जात पंचायतीतील लोक त्यांना सातत्याने त्रास देत होते. वसुलीच्या अनुषंगाने 18 सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बसविण्यात आील होती.

पीडित दाम्पत्याला त्रास देण्यासाठी पंचांनी संबंधित घटनेला वेगळं वळण दिलं. पंचांनी वसुलीसोबतच सोमनाथ याचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचे व त्याने पोलिसांना मदत केल्याचे आरोप करुन दुसरी शिक्षा सुनावली. यानुसार सोमनाथला त्यांनी विष्ठा खाण्यास (forced eat feces) भाग पाडले. त्याच्या पत्नीला नग्न (naked) करुन मारहाण (Beating) केली. या प्रकाराने व्यथित झालेल्या सोमनाथ व सुनिता यांनी 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन (drink poison) केले.

त्यांनी नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता सुनिताची प्रकृती सुधारली.
मात्र, सोमनाथची प्रकृती खालावत जाऊन त्याचा 5 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
पतीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सुनिता यांच्याकडे चौकशी केली असता, सुनिता यांनी जात पंचायतीच्या पापांचा पाढाच वाचला.
बुधवारी रात्री उशीरा आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Osmanabad Crime | jaat panchayat forced man to eat shit and beat woman by doing wrong thing in osmanabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime | अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत डिलिव्हरी बॉयचं विकृत कृत्य; मुंबईतील संतापजनक घटना

Jayant Patil | आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यात बंगला बांधून देण्याच्या आमिषने वृद्धाची पावणे दोन कोटींची फसवणूक; महिलेसह 4 जणांवर FIR

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News