उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Osmanabad Crime News | उस्मानाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका 9 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हि दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरामध्ये घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आर्यन अमर नलवडे असे या अपघातात (Osmanabad Crime News) मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
काय घडले नेमके?
आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. यादरम्यान खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यनच्या डोक्यात पडले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. ही सर्व घटना हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे आर्यनच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलिंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप आर्यनच्या नातेवाईकांनी केला आहे. (Osmanabad Crime News)
व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आर्यनच्या नातेवाईकांनी घेतली आहे. हा वाद चिघळ्यानंतर प्रशासनाने मध्यस्ती करून हा वाद मिटवला. यानंतर प्रशासनाने आर्यनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
Web Title :- Osmanabad Crime News | boy dies after oxygen cylinder falls on his head in osmanabad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल
- Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
- Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत