Osmanabad Crime News | वडिलांकडून पोटच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Osmanabad Crime News | मुलगा सतत दारू पिऊन आई-वडिलांनाच ठार मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी वडिलांनी पोटच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केला आहे. रामराजे सतीश बारकुल असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना येरमाळ्यात गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तर संशयित आरोपी वडील सतीश बारकुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Osmanabad Crime News)

मृत रामराजे बारकुल हे येरमाळा येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. रामराजे हा व्यसनाच्या आहारी गेलेला आणि रोज तो मद्यपान करून आई-वडिलांस ठार मारण्याची धमकी देत असे. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याने घरी जाऊन आईला ठार मारण्याची धमकी दिली आणि नंतर झोपण्यासाठी शेताकडे निघून गेला. रामराजेच्या या प्रकाराला वडील सतीश बारकुल हे फारच वैतागले होते. (Osmanabad Crime News)

शेवटी या प्रकरणाला कंटाळून वडील सतीश बारकुल यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता
नेहमीप्रमाणे शेताकडे गेल्यावर मुलगा रामराजे आणि त्यांच्यात शेती नावावर करून द्या म्हणून झटापट झाली.
या झटापटीत रामराजे खाली पडला यानंतर आरोपी सतीश बारकुल यांनी त्याचा चेहरा ठेचून त्याचा खून केला.
या प्रकरणी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Osmanabad Crime News | osmanabad murder of son by father

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

Nashik ACB Trap | लाच घेताना मनमाड नगरपरिषदेतील तीन कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Raigad Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या; रायगडमधील घटना

Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

Maharashtra Police Recruitment 2023 | पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 वेळेत घेण्याची मागणी